हिरवे सफरचंद की लाल सफरचंद? कोणते आहे फायदेशीर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण आरोग्याबाबत बोलत असतो किंवा विचार करत असतो तेव्हा सफरचंदाचा विषय येतोच. निरोगी आरोग्यासाठी सफरचंद खाणे खुप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि इतर असे अनेक पोषक घटक आहेत. परंतु बाजारात सफरचंदांचे 2 प्रकार आहेत, हिरवे सफरचंद आणि लाल सफरचंद. यातील कोणते सफरचंद आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे याबाबत आपण जाणून घेऊया.

जर आपण चवीचा विचार केला तर लाल सफरचंद चवीला गोड लागतात तर हिरवे सफरचंद थोडेसे आंबट असतात. लोकांना हिरव्या सफरचंदापेक्षा लाल सफरचंद खायला जास्त आवडते. तसा विचार केला तर दोन्ही सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु दोन्ही सफरचंदाचे वेगवेगळे फायदे आहेत.

red apple

ज्यांना शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी लाल सफरचंद ऐवजी हिरवे सफरचंद खावे. हिरव्या सफरचंदात लाल सफरचंदांच्या तुलनेत त्यात कार्बोहायड्रेट आणि शुगर खूप कमी असते

green apple

दुसरीकडे, लाल सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास आणि शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून रोखण्यास मदत होते.

red apple

जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही लाल सफरचंद खायला हवं. लाल सफरचंदात असलेले टीऑक्सिडंट ऊर्जा प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावतात .

उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या सफरचंदांचा समावेश केला तर ते जास्त फायदेशीर ठरू शकते.

green apple

हिरव्या सफरचंदामुळे पाचनक्षमता सुधारते. तसेच शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते