हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Garlic Benefits) थंडीच्या दिवसात हिरव्या पातीचा लसूण बाजारात प्रचंड पाहायला मिळतो. फोडणीसाठी किंवा एखाद्या पदार्थला लज्जत आणण्यासाठी जशी लसूण महत्त्वाची तशीच लसणीची हिरवी पातसुद्धा अत्यंत चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हिरव्या पातीचा लसूण हा अनेक देशी पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. हा लसूण केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर आपले आरोग्यदेखील वाढवतो, असे म्हणतात.
कारण या लसणीच्या पातीमध्ये असणारी अनेक पोषक तत्व ही आपल्या आपल्याला निरोगी ठेवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या पातीच्या लसणीतील औषधी गुणांची माहिती देणार आहोत. यासोबत हिरव्या पातीचा लसूण कसा खावा आणि तो खाल्ल्याने आपल्याला कोणते आरोग्यदायी फायदे होतात? याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
हिरव्या पातीच्या लसणीत असतात औषधी गूण
(Green Garlic Benefits) हिरवा लसूण आणि त्याची हिरवीगार पात स्वतःतच एक औषधी आहे. कारण हिरव्या पतीच्या लसणीत पौष्टिकतेची अजिबात कमतरता नसते. या लसणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंकसारखे महत्वपूर्ण पोषक घटक असतात. जे आपल्या शरीराला अनेक व्याधींपासून संरक्षण प्रदान करण्यास सक्षम असतात.
हिरव्या पातीचा लसूण कसा खावा?
आपल्या दैनंदिन आहारात आपण जसा पांढरा लसूण खातो अगदी तसाच हिरव्या पातीचा लसूण खाता येतो. याशिवाय हिरव्या लसणीच्या पातीची भाजी, आमटी, सूप किंवा चटणी बनवून देखील खाता येते. इतकेच काय तर हिरव्या पातीचा कांदा जसा कच्चा खाल्ला जातो अगदी तसाच हिरव्या पातीचा लसूणदेखील खाल्ला तर उत्तम.
हिरव्या पातीचा लसूण खाण्याचे फायदे (Green Garlic Benefits)
1) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
हिरव्या पातीचा लसूण खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कारण हिरव्या लसणात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशींना समर्थन देते. तसेच हिरव्या लसणातील अँटी- मायक्रोबियल गुणधर्म हे शरीराला बॅक्टेरियापासून संरक्षण देतात.
2) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
(Green Garlic Benefits) हिरव्या पातीच्या लसणीत एलिसिन असते. जे हृदयाशी संपर्कात असणाऱ्या रक्तवाहिन्यांची काळजी घेते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येत नाही. तसेच त्यामध्ये प्लेक जमा होण्यापासून प्रतिबंधित केला जातो.
3) उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण
हिरव्या पातीचा लसूण हा ताण तणाव कमी करतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत होते. या लसणीच्या असणारे एलिसिन हे हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून काम करतात आणि आरोग्याची काळजी घेतात.
4) कॅन्सरचा धोका टळतो
हिरव्या पातीचा लसूण खाल्ल्याने कॅन्सरच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो. कारण हिरव्या लसणात एलिसिन नावाचा सक्रिय घटक असतो. जो कॅन्सरच्या पेशी नष्ट करतो आणि कॅन्सर होण्याचा धोका टळतो. (Green Garlic Benefits)
5) हाडं आणि केस मजबूत राहतात
हिरवा लसूण हा आपल्या शरीरातील हाडांची झीज थांबवून त्यांना मजबूत बनवतो. तसेच हिरवा लसूण खाल्ल्याने त्वचेला आणि केसांनाही भरपूर फायदा होतो.