इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या स्मृतिदिनी काँग्रेसच्या वतीने अभिवादन सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची 37 वी पुण्यतिथी व देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 146 वी जयंती आज 31 ऑक्टोबर रोजी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी व कराड शहर काँग्रेस च्या वतीने साजरी करण्यात आली. या दोन्ही नेत्यांच्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह दक्षिण काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन थोरात, नानासाहेब जाधव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, इंद्रजीत चव्हाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, देवदास माने, कराड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चनाताई पाटील, मिनाक्षी मारुलकर, राजश्री पाटील, सुप्रिया पाटील आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले कि, देशाची एकता आणि अखंडता साठी काँग्रेसच्या या दोन्हीही नेत्यांचे योगदान बहुमूल्य आहे. देशभक्ती व देशासाठी समर्पणाची भावना या दोन्ही नेत्यांनी राष्ट्राला दिली. देशातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी धोरणात्मक निर्णय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतले. या दोन्ही नेत्यांचे देश घडविण्यासाठीचे योगदान भारतवासी कधीही विसरणार नाहीत.

तसेच याप्रसंगी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने म्हणाले कि, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व स्व सरदार वल्लभभाई पटेल या दोन्ही नेत्यांना भारताचे सर्व नागरिक आदराने आठवण ठेवत असतात, या दोन्ही नेत्यांचे योगदान कधीही न विसरणारे आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, कोळस्याबाबत स्वयंपूर्णता, शेतकऱ्यांना निर्भर बनविण्याचे निर्णय अश्या धोरणात्मक निर्णयांबाबत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे योगदान महत्वपूर्ण आहे.