कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
टेंभू (ता. कराड) येथे टेंभू-सयापूर विविध कार्यकारी सेवा सोसयटीमध्ये थोर विचारवंत, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची 166 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन बब्रुवाहन पाटील, व्हा. चेअरमन रमेश जाधव यांच्याहस्ते गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चेअरमन बब्रुवाहन पाटील म्हणाले, गोपाळ गणेश आगरकरांनी मराठी वर्तमान सृष्टीचा पाया रचला. महाराष्ट्रातील सामाजिक अभिसरणाच्या कामात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी पत्रकारितेत दिलेले योगदान अजरामर बनले आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आगरकर हेच होते. पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही आगरकर यांचे मोलाचे योगदान आहे. आगरकरांचा जन्म टेंभू गावात झाला ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक विलास भंडारे, सोसायटीचे संचालक विलास सावंत, संजय हुलवान, रंजना महाडीक, धोंडीराम जाधव, रामकृष्ण जाधव, रामचंद्र कदम, मंगल यादव, विकास घाडगे, अशोक भंडारे, पोलीस पाटील रूबिना मुलाणी, दत्तात्रय चरेगावकर, केशव सावंत, बाळासो पाटील, निवास बाबर, सुभाष शिंदे, संतोष गुरव, माणिक ठोंबरे, विजय शिंदे, चंद्रहास शिंदे, बाळासो बाबर, बबन भंडलकर, जगन्नाथ कुंभार, हणमंत कदम, कृष्णत जाधव, सुजित नलवडे, रमेश भंडारे, रामचंद्र सावंत, सचिव सुखदेव शिंदे, राहुल पाटील, कोंडीराम मदने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.