हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 22 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच रशियाची मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे बाब रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना एकेकाळी या मॉडेल ने मनोरुग्ण म्हंटल होत.
तेवीस वर्षीय ग्रेटा वेडलर हिने वर्षभरापूर्वी पुतीन यांना मनोरुग्ण म्हटलं होतं. तेव्हापासून ती गायब होती. पण त्यानंतरही तिची सोशल मीडिया अकाऊंट सुरूच होती. त्यामुळे ती गायब झाल्याची किंवा तिचा मृत्यू झाल्याचा संशय कुणालाही आला नव्हता. अखेर एका बॅगेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला आहे.
मॉडेल ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स-बॉयफ्रेण्ड दिमित्री कोरोविनने केली. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरुन कारच्या डिक्कीत ठेवला. कोरोविनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रेटा वेडलरला 300 मैल अंतराव असलेल्या लिपेट्स्क इथे घेऊन गेला. तिथे तिची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ही सुटकेस गाडीच्या डिक्कीत ठेवून तसाच निघून गेला.