हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली… खरंतर या योजनेला महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या काँग्रेसचा विरोध आहे… पण अगदी लाडक्या बहिणीसारखीच एक योजना काँग्रेस कर्नाटक मध्ये राबवतय… जीचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना… अगदी कर्नाटक सरकारच्या योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजना देखील आहे… पण समसमान योजनेसाठी काँग्रेसने वेगवेगळी भूमिका घेतली… आणि आता त्यात मोठा गाजावाजा करत घोषणा केलेली महालक्ष्मी योजनाही वादात सापडली… नेमकं काय घडलंय? त्याचाच हा रिपोर्ट…
काँग्रेसने कर्नाटकातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्या पाच मी दिल्या होत्या त्यातील एक महत्त्वाची हमी होती ती गृहलक्ष्मी योजनेची… राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची मदत करणारी ही योजना काँग्रेस सरकार निवडून आल्यावर सुरूही करण्यात आली… राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या बड्या नेत्यांच्या हातून या योजनेचा शुभारंभ झाला… पण तब्बल तीन महिने उलटून गेले तरी कर्नाटकातील महिला लाभार्थ्यांना लक्ष्मी काही बघायला भेटलेली नाही… मागच्या वर्षी 15 ऑगस्ट ला सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा काही अपवाद वगळता मे पर्यंत कार्यक्रम ठीकठाक सुरू होता… मात्र मागील तीन महिन्यांपासून हे पैसे न आल्यानं योजना बंद झाली की काय? अशी म्हणण्याची वेळ आता कर्नाटकातील महिला विचारू लागले आहेत… पण किमान सरकार दरबारी तरी योजना बंद झाल्याची… थकबाकी असल्याची.. कोणतीही नोंद नाही…
मुख्यमंत्री सिद्धरामय्या योजनेची रक्कम केवळ एका महिन्याची थकीत असल्याचे सांगतायत खरं, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे… विधानसभा निवडणुकीत फक्त दोन वेळा योजनेचे पैसे आल्यानंतर पुन्हा सरकारने कोणतीही रक्कम जमा केलेली नाही, असं स्पष्ट म्हणणं महिला लाभार्थी मांडतायत… त्यामुळे या निमित्ताने काही मूलभूत प्रश्न आता पडतायेत, महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेस एकीकडे विरोध करतेय… आवश्यकता वाटली म्हणून सुप्रीम कोर्टाचेही दरवाजे ठोकवण्याची तसदी काँग्रेसने घेतली… पण महिलांना पैसे देण्याच्या धर्तीवर काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये मात्र अशाच योजनेची घोषणा केली, त्याला मात्र विरोध नाही… यावरून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलय…
त्यामुळे महिला, वंचित, गरीब कल्याणासाठी, आम्ही आहोत, असं म्हणणाऱ्या काँग्रेससाठी , निवडणुकीआधी एक, आणि निवडणुकीनंतर एक… अशा घेतलेल्या स्टॅन्डमुळे , पक्षाला टीकेचं धनी बनावं लागणार… एवढं मात्र नक्की… म्हणूनच , महाराष्ट्रात महायुती सरकारने, अशाच काहीशा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला, काँग्रेसने केलेला विरोध, हा फक्त राजकीय भूमिका म्हणूनच घेतलाय, असा आरोपही , आता केला जातोय… त्यामुळे काँग्रेसने, महिलांसाठी घोषणा केली… आणि वाया गेली… असं म्हटलं , तर वावगं ठरणार नाही… बाकी तुम्हाला काय वाटतं? कर्नाटकातील काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…