चार वेळा मुलगी बघायला गेल्यावर ठरलेल्या लग्नाला अचानक दिला नकार; नवरदेवाला वधुपक्षाने बंद खोलीत चांगलाच फटकावला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात असे लोक असतात ज्यांना ठरलेल्या गोष्टी ऐनवेळी बदलायची सवय असते. बऱ्याचदा मुलगी पाहायला गेलेला मुलाचे लग्नही त्यातच येते. कित्येक वेळा मुलीला पहायला येऊन कांदे- पोह्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरते. आणि ऐनवेळी नवरदेव इतर लोकांचे ऐकून लग्नाला नकार देतो. अशीच एक घटना अकोल्यामध्ये घडली आहे. चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर साखरपुडाही पार पडला. त्यानंतर ऐनवेळी नवरदेवाने नवरीच्या डोळ्यात दोष असल्याचं सांगत आढेवेढे घेतले. त्यामुळे संतापलेल्या वधूपक्षाने नवरदेवाला बंद खोलीत धू-धू धुतला. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सद्ध्या सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा होत आहे.

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील खापरखेड येथील मुलाने शेजारच्या गावची एक मुलगी चार वेळा बघायला जाऊन पसंत केली. त्यानंतर अचानक लग्नाला नकार कळवला. चार वेळा पाहणी करुन पाहुणचाराचा मोठा फटका आणि मनस्ताप मुलीच्या कुटुंबाला दिल्यावर पाचव्यांदा मुलीत खोट काढणाऱ्या नवऱ्या मुलाला कपडे घेण्याच्या बहाण्याने बोलावून वधूपक्षाने बंद खोलीत मोकार बदडलं. नांदुरा तालुक्यातील अलमपूर गावातील मुलीच्या सोयरीकीचा हा किस्सा चांगलाच चर्चेत आहे.

वरील गोष्टीचा राग मनात धरून वधुपक्षाने मध्यस्थामार्फत पुन्हा पाहणी आणि कपडे घेण्यासाठी नवऱ्या मुलाला बोलावून घेण्यात आले. नवऱ्या मुलाला बंद खोलीत बोलावून त्याची यथेच्छ धुलाई करुन चांगलाच पाहुणचार करण्यात आला. या घटनेची कुणीतरी चित्रफीत काढली व ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

You might also like