पाचगणी प्रतिनिधी | भारतात कोरोनो संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असुन आरोग्य विभाग व पोलीस विभाग सजग प्रशासन म्हणुन अहोरात्र काम करत आहे . या सजग प्रशासनाच्या दोन्ही विभागाना कोरोनो रोगाचा मुकाबला करताना खबरदारी म्हणुन मास्कचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सातारा जिल्ह्यांच्या भाजप महीला उपाध्यक्षा वैशाली भिलारे याच्या बचतगटासह भिलारच्या महीलाबचत गटांनी मास्क तयार करुन पोलीसदलाला वाटण्याचा उपक्रम पाचगणी येथे पार पाडला आहे.
पुस्तकाच गाव भिलार म्हणुन नावलैाकीक असलेल्या भिलार गावांच्या महीला बचतगटांनी मास्क उत्पादन करत बचतगटाच्या माध्यमातुन पाचगणी पोलीस दलाला व आरोग्य विभागाला मास्क देण्याचा सामाजिक बांधिलकी पुस्तकाच गाव भिलारच्या महीला बचतगटांनी राबवल्याने सामाजिक बांधिलकी जापासणार्या महीला बचत गटाचे कैातुक महाबळेश्वरसह सगळीकडे होताना दिसत आहे.
पुस्तकाच गाव भिलार यागावातील भाजपच्या सातारा जिल्हा महीला उपाध्यक्ष वैशाली भिलारे यांनी गावातील महीला बचत गटानमध्ये जागृती करत ना नफा ना तोटा या तत्वावर मास्कचे घरगुती उत्पादन करत महीलांच्या हाताला काम दिले तर देशावर कोसळलेल्या ससर्गरोगाचा मुकाबला करताना पोलीस व आरोग्य अधिकारी जीवाची बाजी लावताना त्यांना सरक्षणाकरीता मास्कचे वाटप पुस्तकाच गाव भिलारचे महीला बचतगट पुढे आले आहेत . पुस्तकाच गाव भिलार यामधील कोटेश्वरी महीला बचत गटाने वैशाली भिलारे याच्या मार्गदर्शनाखाली मास्क तयार करुन पोलीस व आरोग्य विभागाला वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे .