नवी दिल्ली | जीसॅट-११ या भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बुधवारी युरोपीयन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुयाना येथून करण्यात आले. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळे दर सेकंदाला १०० जीबी ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे.
२९ मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर जीसॅट-६ ए हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी जीसॅट-११ चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली.
जीसॅट-११ उपग्रहाची काही खास वैशिष्ट्ये
१) इंटरनेटचा स्पीड वाढणार
२) ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळणे सुलभ होणार
३) प्रति सेकंदाला १०० गीगाबाईटपेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळेल.
४) जीसॅट-११ या उपग्रहात ४० ट्रान्सपाँडर कू-बँड आणि का-बँड फ्रिक्वेंसीमध्ये आहेत. त्यामाध्यमातून हाय बँडविथ कनेक्टिव्हिटी १४ गिगाबाईट सेकंद डेटा ट्रान्सफर स्पीड देता येणे शक्य आहे.
५) जीसॅट-११ चे खास वैशिष्ट्य म्हणजे हा उपग्रह बीम्सचा अनेकवेळा वापर करण्यास सक्षम आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण क्षेत्रफळाला कव्हर करणे त्याला शक्य होईल.
https://twitter.com/arianespaceceo/status/1070058476964143109?s=19