आता नॉन-ब्रँडेड तांदूळ अन् मैद्यावरही द्यावा लागणार 5 टक्के GST

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. चंदीगडमध्ये GST कौन्सिलची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. ज्यामध्ये नॉन-ब्रँडेड तांदूळ आणि मैद्यावर 5% GST लावण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. ज्यामुळे आता नॉन ब्रँडेड पीठ आणि तांदळाच्या किंमती वाढणार आहेत. याआधी फक्त ब्रँडेड पीठ आणि तांदळावरच 5% जीएसटी लागू होता. याव्यतिरिक्त आता मांस, मासे, दही, पनीर आणि मध यांसारख्या प्री-पॅकेज आणि लेबल्ड केलेल्या खाद्यपदार्थांवरही 5% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Unbranded packaged foods to be brought under GST

हे लक्षात घ्या कि, चंदीगडमध्ये सुरू असलेल्या GST कौन्सिलची 47 वी बैठक आहे. मंगळवारी ही बैठक सुरू झाली. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी अनेक गोष्टींच्या टॅक्स रेट्समध्ये सुधारणा करण्याचा आणि काही गोष्टींवरील टॅक्स सवलत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सोने आणि मौल्यवान धातूंवरील जीएसटी रेट तर्कसंगत करण्याच्या मंत्र्यांच्या गटाच्या शिफारशीही स्वीकारण्यात आल्या आहेत.

GST Council Meeting: बिना ब्रांड वाले डिब्बाबंद खाने पीने की चीजों पर लगेगा  टैक्स, दही-पनीर हुए महंगे | TV9 Bharatvarsh

आता ‘या’ वस्तू महागणार

पीठ आणि तांदूळ यांसारख्या नॉन-ब्रँडेड वस्तू, जर प्री-पॅकेज आणि लेबल्ड केलेल्या असतील तर त्यावर 5 टक्के टॅक्स लागू होईल.
चेक इश्यू करण्यासाठी बँकांकडून आकारले जाणाऱ्या शुल्कावर आता टॅक्स आकारला जाईल.
सुक्या शेंगा भाज्या, गहू किंवा मेसुलिन पीठ, गूळ, तांदूळ, सर्व प्रकारच्या सेंद्रिय वस्तू आणि कंपोस्ट आणि ताग यांवर आता पाच टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
प्रिंटिंग, राइटिंग आणि ड्रॉईंग शाई, चाकू, चमचे आणि टेबल वेअर, डेअरी मशिनरी, एलईडी लाईट्स आणि ड्रॉईंग उपकरणांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
सोलर वॉटर हीटर्स आणि फिनिशिड लेदरवरील जीएसटी दर आता 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के करण्यात आला आहे.

Differential tax levy under GST: Food firms may de-register trademarks |  Business Standard News

104 वस्तूंवर जीएसटी लागणार नाही

डाळी, तांदूळ, मैदा अशा 104 खाद्यपदार्थांवर आतापर्यंत जीएसटी आकारला जात नाही. यापैकी जवळपास 24 अशा वस्तू आहेत, ज्यांची खुल्या मार्गाने विक्री होत असेल तरच त्यावर जीएसटी भरावा लागणार नाही. म्हणजे जर या वस्तू ब्रँड नावाने विकल्या जात असतील तर त्यावर 5% जीएसटी द्यावा लागेल. या 24 खाद्यपदार्थांमध्ये गहू, गव्हाचे पीठ, मैदा, रवा, रवा, तांदूळ, हरभरा, मूग, उडीद, तूर यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gst.gov.in/

हे पण वाचा :

Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या

अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घट, आजचे दर तपासा

New Labour Codes : 1 वर्ष काम करूनही ग्रॅच्युइटी मिळेल का ???

आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!

Leave a Comment