दुप्पट पैसे कमविण्यासाठीची ‘ही’ विशेष योजना ! आता 118 महिन्यांत पैसे होतील दुप्पट; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले पैसे दुप्पट करण्याचा विचार करीत असाल तर आपण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला त्याचे पैसे आणि चांगले उत्पन्न मिळण्याची हमी मिळते. या योजनेसाठी व्याज दर आणि गुंतवणूकीची दुप्पट रक्कम ही तिमाही आधारावर सरकार ठरवते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, या किसान विकास पत्रात मॅच्युरिटीचा कालावधी हा 124 महिने आहे. म्हणजेच आता या योजनेतील ग्राहकांची गुंतवणूक 124 महिन्यांमध्ये म्हणजेच 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होईल.

गुंतवणूक कोण करू शकतं ?
या किसान विकास पत्रातील (KVP) गुंतवणूकीसाठीचे किमान वय हे 18 वर्षे असणे आवश्यक आहे. सिंगल अकाउंटशिवाय त्यात जॉईंट अकाउंटची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील अस्तित्वात आहे, ज्याची देखरेख पालकांनी करावी लागेल. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे एचयूएफ किंवा एनआरआय वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. केव्हीपीकडे 1000, 5000, 10,000, आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, जे खरेदी करता येतील.

व्याज दर
KVP साठीचा व्याज दर आर्थिक वर्ष 2021 च्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत 6.9 टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे. होय, आता आपली गुंतवणूक ही 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एकूण 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. 124 महीने हा या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी आहे.

किसान विकास पत्र जारी केल्याच्या अडीच वर्षानंतर परत मिळू शकेल. ही KVP योजना एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित केली जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडेही हस्तांतरित केली जाऊ शकते. KVP मध्ये नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे. हे किसान विकास पत्र पासबुकच्या स्वरूपात जारी केले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment