कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील शिवाजी स्टेडीयममध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पाहणी
बॅडमिंटन कोर्टचे काम पाहून व्यक्त केले समाधान केले. यावेळी पालकमंत्र्यांनी बॅडमिंटन कोर्टवर फटकेबाजीही केली. जिल्हा वार्षिक योजनेतून या बॅडमिंटन कोर्टसाठी अंदाजे 14 लाख रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे.
यावेळी लोकशाही आघाडी अध्यक्ष जयंत पाटील, गटनेते नगरसेवक सौरभ पाटील, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, किशोर कुलकर्णी, निलेश फणसळकर, अतुल पाटील, मा. सरपंच अजित पाटील, मिलींद रैनाक आदी उपस्थित होते.
कराड येथील बॅडमिंटन खेळाडूना यापूर्वी बाहेर खेळताना अडचणी येत होत्या. आता नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टमुळे त्यांना बाहेर सहजपणे खेळता येणार आहे. या बॅडमिंटन कोर्टमध्ये सर्व प्रकारच्या सूविधा देण्यात आलेल्या आहेत. नुकतेच शासनाने निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्याचबरोबर इनडोअर खेळाला परवानगी दिली आहे. याचा बॅडमिंटन खेळाडूना लाभ होणार आहे.