Guava Farming | पेरू लागवडीसाठी सरकार देतंय 50 टक्के अनुदान, अशाप्रकारे करा अर्ज

Guava Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Guava Farming | आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. अनेक लोक आपल्या उपजीविकेसाठी शेती करत असतात. त्यामुळे भारतात अनेक गोष्टी तयार होतात. आणि त्या गोष्टींची निर्यात देखील केली जाते. शेतकरी आजकाल पारंपरिक पद्धतीने शेती न करता शेतीच्या अनेक नवनवीन पद्धती वापरत आहेत. अनेक तरुण देखील त्यांची नोकरी सोडून शेती या व्यवसायाकडे एक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत आहेत. अनेक नवनवीन फळांची त्याचप्रमाणे झाडांची लागवड करून आजकाल शेतकरी चांगली कमाई कमवत आहे. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका पिकाची माहिती सांगणार आहोत. ज्या पिकाची लागवड केल्यानंतर तुम्हाला खूप चांगला नफा मिळेल. आणि खास गोष्ट म्हणजे सरकारकडून देखील तुम्हाला या पिकासाठी अनुदान मिळणार आहे.

आज आपण पेरू (Guava Farming ) पिकाच्या लागवडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पेरूची लागवड आजकाल मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे सरकार देखील पेरूच्या लागवडीसाठी आता 50 टक्के अनुदान देत आहे. आता हे अनुदान सरकारकडून नक्की कसे घ्यायचे? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पेरू लागवडीवर अनुदान कसे घ्यावे ? | Guava Farming

सरकारच्या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी उद्यान विभागात नोंदणी करावी लागेल. नोंदणी नंतर ते स्वखर्चाने तुमची पेरूची बाग तयार करतील. आणि पेरूच्या गोळीवर 50 टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यांमध्ये पोहोचते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.

पेरू शेतीसाठी अर्ज कसा करावा ?

शेतकरी आणि फलोत्पादन विभाग आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करता येईल. भरलेला अर्जांसह आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता तुम्हाला अधिकाऱ्याकडे करावे लागेल. त्यानंतर अर्जाचे मूल्यमापन होईल आणि पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात दिली जाईल. तुम्ही घेतलेल्या पिकाचे सर्वेक्षण फक्त 50% खर्च तुमच्या खात्यावर पाठवला जाईल.