सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गुढीपाडवा सणादिवशी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यासाठी गेल्या 100 वर्षापासून सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये श्री.शंभू महादेवाची कावड यात्रा काढली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाने निर्बंध घालत कावड यात्रा रद्द केली होती, मात्र नुकतेच राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम निर्बंधामुक्त केल्याने यावर्षी गुढीपाडवा उत्साहात सातारा केला जात आहे.
सातारा शहरातील मानाची असलेली कावड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या कावड यात्रेची मिरवणूक सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवर काढण्यात आली. पुढील अकरा दिवसानंतर ही कावड यात्रा शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या श्री शंभू महादेवाच्या भव्य कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहे .
गुढीपाडव्याच्या दिवशी सातारा येथे सुरू झालेली कावड यात्रेची सांगता शिखर शिंगणापूर येथे होणार असल्याची माहिती कावडीचे मानकरी असलेल्या दरवेशी कुटुंबीयांनी दिली आहे.




