हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Guillain Barre Syndrome- भारतात अनेक रोगांचा शिरकाव होताना दिसत आहे. एक व्हायरस झाला कि दुसऱ्याची एंट्री होत आहे. आता पुण्यात गुईलेम बॅरे सिंड्रोमचा ( Guillain Barre Syndrome) संसर्ग दिसून आला असून, आतापर्यंत तब्बल 22 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये या दुर्बल करणाऱ्या आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने आरोग्य विभाग तात्काळ अलर्ट मोडवर आला आहे. गुईलेम बरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे जो सामान्यत: शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेने असतो आणि यामुळे नसांवर प्रभाव पडतो. या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात तसेच संवेदना कमी होतात, ज्यामुळे शरीराच्या काही भागांचा पॅरालिसिस होऊ शकतो. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
गुईलेम बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) –
गुईलेम बॅरे सिंड्रोम म्हणजे शरीराच्या नसांवर होणारा एक हल्ला. हा विकार शरीरातील पेरिफेरल नर्वस सिस्टीम (Peripheral Nervous System) ला प्रभावित करतो. गुईलेम बॅरे सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये स्नायूंचा कमकुवत होणे, पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होणे, श्वास घेण्यास त्रास, बोलणे आणि गिळण्यास अडचण यांचा समावेश होतो.
आजाराची कारणे –
गुईलेम बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. शारीरिक प्रतिकारशक्ती कमजोर झाल्यासही या आजाराचा धोका वाढू शकतो. डॉ. निना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे पालिका यांनी सांगितले की, गुईलेम बॅरे सिंड्रोमवर सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे.
लोकांनी कोणती काळजी घायवी –
हात वारंवार स्वच्छ धुवा.
ताप आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.
शरीरात कमकुवतपणा किंवा मुंग्या येणे, तसेच संवेदना कमी होण्याची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्य विभागाने सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आणि लक्षणे दिसल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील हवामान पुढील 5 दिवस कसे असेल? IMD चा अंदाज पहाच