टीम हॅलो महाराष्ट्र । भारतात खूप जणांनी आगळे-वेगळे छंद जोपासत आपल्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. गुजरातच्या अरावलीमध्ये राहणाऱ्या १७ वर्षाच्या नीलांशी पटेलने सुद्धा आपला छंद जोपासत स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत नवा विक्रम नोंदवला आहे. नीलांशीला लांब केस ठेवण्याची आवड होती. याच आवडीतून नीलांशीने २०१८ मध्ये किशोर वयोगटात जगातील सर्वात लांब केसांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला होता. या रेकॉर्डनुसार नीलांशीच्या केसांची लांबी तब्बल १७०.५ सेंमी इतकी भरली होती.
मात्र, आता नीलांशीने आपला हाच रेकॉर्ड मोडीत काढला आहे. यावेळी तिच्या केसांची लांबी १९० सेंमी भरली आहे. त्यामुळं नीलांशीने पुन्हा एकदा जगातील किशोर वयोगटात सर्वात लांब केस असल्याचा दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. ”मी जेथे कुठे जाते तेथे लोक माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आग्रह करतात त्यामुळं आजकाल मला सेलिब्रिटीसारखे वाटत आहे.” असं नीलांशी आनंद व्यक्त करताना म्हणाली.
Gujarat:17-yr-old Nilanshi Patel,resident of Aravalli, breaks her own Guinness World Records in ‘longest hair on a teenager’ category with 190 cm hair. In 2018, her hair was measured at 170.5 cm.”Wherever I go,people want to click selfie with me.I feel like a celebrity,”she says. pic.twitter.com/9s2XH3nfwC
— ANI (@ANI) January 15, 2020