गुजरातमध्ये चक्क नोटांचा पाऊस, टेरेसवरून 100- 500 च्या नोटा उधळल्या; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे गुजरात मध्ये मात्र गरिबांच्या जखमेवर मीठ चोळणारी घटना घडली आहे. गुजरातमधील मेहसाणामध्ये एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नात चक्क नोटांचा पाऊस पाडला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर उभे राहून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा उडवल्या. या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. नोटा उचलण्यासाठी अनेकांमध्ये बाचाबाचीही झाली.

अक्षय पटेल नावाच्या एका सोशल मीडिया यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लोक लग्न समारंभात घराच्या छतावरून लाखो रुपयांच्या नोटा उडवताना दिसत आहेत. यादरम्यान बॅकग्राउंडला जोधा-अकबर चित्रपटातील अझिमो-शान शहेनशाह हे गाणे वाजत होते. शोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चक्क नोटांचा पाऊस पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.

https://twitter.com/akshayhspatel/status/1626841484321501185?s=20

सरपंचाने असे का केले, याचे कोणतेही स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र गुजरातमध्ये लग्नसोहळा, गाण्यांचे कार्यक्रम तसेच इतर मोठ्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पाडण्याची पद्धत जुनी असल्याचं बोललं जात आहे. मात्र एकीकडे देशात महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत असताना दुसरीकडे नोटांचा वर्षाव केल्याने एकच खळबळ माजली आहे.