व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नीती आयोगाच्या निर्यात तयारी इंडेक्स मध्ये गुजरात अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली । NITI आयोगाच्या निर्यात तयारी इंडेक्स 2021 मध्ये गुजरातने अव्वल स्थान पटकावले आहे. या इंडेक्स मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सरकारच्या थिंक टँक NITI आयोगाने शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

निर्यात पूर्वतयारी इंडेक्स निर्यात संभावना आणि कामगिरीच्या संदर्भात राज्यांची तयारी मोजतो. या इंडेक्स मधील पहिल्या पाच राज्यांमध्ये तामिळनाडू आणि हरियाणा यांचाही समावेश आहे. शुक्रवारी हा इंडेक्स जारी करताना NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की,” यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्यातीसाठी योग्य धोरण तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात मदत होईल.”

गुजरात राज्याने NITI आयोगाच्या निर्यात तयारी इंडेक्स 2021 मध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. या इंडेक्स नुसार, गुजरातची निर्यात तयारी 78.86 अंकांवर आहे, तर महाराष्ट्र 77.14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मागच्या वेळीही महाराष्ट्र या इंडेक्स मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.

केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे
या लिस्टमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ गोवा, जम्मू-काश्मीर, चंदीगड आणि पुद्दुचेरी यांचा क्रमांक लागतो. हिमालयात वसलेल्या राज्यांपैकी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम आणि मणिपूर ही राज्ये पहिल्या पाचमध्ये आहेत.