गुजरातमध्ये बलात्कारानंतर मुलीची निर्घृण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । गुजरातमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कारकरून तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षाच्या दलित मुलीवर चौघा नराधमांनी बलात्कार केला. बलात्कार करून नंतर दलित मुलीची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.

दरम्यान ही पीडित मुलगी 31 डिसेंबरपासून बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मात्र मुलीचा मृतदेह त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. पीडितेच्या कुटुंबियाला याची माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हजारो दलित समुदायानं घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दलित समुदायानं मोदसा पोलीस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं. याप्रकरणी दोषी नराधमांना तातडीन अटक करण्याची मागणी दलित समुदायान केली. तसेच त्यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबत करण्याची मागणी करण्यात आली आहे. दलित समुदायात वाढता रोष पाहून पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.