खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद : वृत्तसंस्था – खेळता खेळता लहान मुलं बोअरवेलमध्ये (borewell) पडल्याची बरीच प्रकरणे या अगोदर घडली आहेत. बोअरवेलमध्ये (borewell) पडलेल्या प्रिन्सला तर तुम्ही आजही विसर नसाल. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. यामध्ये एक चिमुकला खेळताना बोअरवेलमध्ये (borewell) पडला. अवघ्या दोन-तीन वर्षांचा हा चिमुकला आहे. त्या मुलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण
धांग्रधाच्या दुदापूर गावामधील मजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील हा मुलगा. बोअरवेलजवळ खेळत होता. त्याचवेळी तो तोल जाऊन अचानक बोअरवेलमध्ये (borewell) पडला. यानंतर या घटनेची माहिती आर्मीच्या जवानांना देण्यात आली. यानंतर त्यांनी तातडीने चिमुकल्याला बोअरवेलमधून (borewell) बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवानांनी चिमुकल्याला वाचवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. त्यामध्ये त्यांना यश आले. बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी ध्रांगध्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याआधी बोअरवेलमध्ये (borewell) पडलेल्या काही मुलांचा जीवही गेला आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडल्या आहे. 2015 साली उस्मानाबाद जिल्ह्यात केशेगाव या गावातील अनिकेत पाटोळे या 4 वर्षांच्या मुलालाला 300 फूट खोल बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 2016 साली पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या सुनील मोरेला तब्बल 31 तासांनंतर बाहेर काढण्यात यश आलं. पण उपचारादरम्यान सुनीलचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.

हे पण वाचा :
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा !!!

OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान !!!

खुशखबर !!! नवीन M2 चिप सहित येणार नवीन MacBook Pro आणि MacBook Air

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

Leave a Comment