राज ठाकरे हे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते ; गुलाबराव पाटील यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या जाहीर मेळाव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यानंतर शिवसेना नेत्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान आज शिवसेना नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. राज ठाकरे हे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत, अशा शब्दात पाटील यांनी टीका केली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी पाटील म्हणाले की, निसर्गात तीन प्रकारचे ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. या तीन ऋतूप्रमाणे बदलणारे राज ठाकरे हे नेते आहेत. ज्यावेळी त्यांनी मनसे पक्षाची घोषणा केली आणि तो स्थापन केला. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील लोकांवर निशाणा साधला. आणि ज्यावेळी पक्ष स्थापन झाला. त्यानंतर त्यांनी हम सब भाई है असे म्हंटले. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला.

मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Leave a Comment