“…हे बालिशपणाचं लक्षण आहे”, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भूखंड घोटाळ्यावरून मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या घोटाळ्यावरून विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी भूखंड घोटाळा उघडकीस आला म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन सारवासारव करत आहेत, असा आरोपदेखील संजय राऊत यांनी केला आहे.

यानंतर आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अवघे तीन ते चार महिने झाले आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणे, हे बालिशपणाचं लक्षण आहे. दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं. केंद्रातून काही योजना किंवा पैसे आणायचे असतील, तर ते दिल्लीला जातात. योगायोगाने हे प्रकरणही एकाचवेळी आलं तर ते सारवासारव करायला गेले, असा आरोप करणं उचित नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) दिली आहे.

तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नने उपस्थित केले होते. या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला पूर्ण वेळ मिळाला नाही. त्यामुळे खडसे यांनी मांडलेल्या विषयांना उत्तर देता आलं नाही, अशी खंत पाटलांनी (Gulabrao Patil) यावेळी व्यक्त केली.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या