कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करण्यास आलेल्या एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. अभिजीत उर्फ पप्पू लक्ष्मण मोरे (वय 25, रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
संशयित अभिजित मोरे यांच्याकडून पिस्टलसह गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे अशी 1 लाख 20 हजारांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोपर्डे हवेलीत एकजण पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी तेथे सापळा रचला. जर्किन व काळ्या रंगाची पँट असा पेहराव केलेला संशयित दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कंबरेला डाव्या बाजूस एक देशी बनावटीचे स्टीलचे पिस्टल त्यास लाकडाच्या चॉकलेटी रंगाचा बट कव्हर अडकवलेले आढळून आले. तर उजव्या बाजुला लोखंडी मॅग्झीनसह व एक देशी बनावटीचा धातूचा गावठी कट्टा लाकडाची चॉकलेटी रंगाची मुठ असलेला सापडला. खिशात दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करीत असुन त्याने कोठून अग्निशस्त्रे आणली व कोणाला विक्री करणार होता याबाबत तपास चालु असुन त्यास मा. न्यायालयात भेटविले असता त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल तसेच अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी केली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group