Thursday, October 6, 2022

Buy now

सातारा पोलिसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहचणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांच्या बद्दल वापरले होते अपशब्द त्या कारणास्तव घेतले सातारा पोलिसांनी (Satara Police) मुंबईतून गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासोबत त्याची सातारा पोलिसाची टीम साताऱ्याकडे रवाना झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील घडामोडी थंडावलेल्या असून आता साताऱ्यात घडामोडींना वेग आलेला पहायला मिळणार आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती साताऱ्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. या अनुशंगाने गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सातारा शहर पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली आहे. साधारण दीड वर्षापुर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या तक्रारीवरती अद्याप सातारा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. सातारा पोलिसांनी चौकशीसाठी सरकारकडे ताबा मागितला होता. सरकारच्या मंजूरीनंतर चौकशीसाठी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साधारण चारवाजेपर्यंत पोलिसांचा ताफा साताऱ्यात पोहोचेल.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले होते?

तक्रारदार राजेंद्र निकम यांनी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागचे कारण सांगितले. यामध्ये ते म्हणाले की, दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे की, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज हे अफजल खानाची औलाद आहे, अफजलच्या प्रवृत्ती आहेत. असे वारंवार आक्षेपार्ह विधान केले आहे. एका वकिली पेशा असणाऱ्या व्यक्तीने असे विधान करीत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. या विरोधात दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी सतरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.