शरद पवारांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोरोनाचे नियम नाहीत का असा सवाल करत शरद पवारांना तात्काळ अटक करण्याची मागणी जेष्ठ वकील गुणारत्ने सदावर्ते यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावरून सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला.

शरद पवार, दिलीप वळसे पाटील तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोव्हिड नियम नाही का? असा सवाल करत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मला तुम्हाला सांगायचं आहे, शरद पवार यांना अटक करा, नाहीतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु आणि आम्ही तशी तक्रार केली आहे” असं सदावर्ते म्हणाले.

You might also like