गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार?? स्वतःचे पॅनल उभं करण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे वकील गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चानी उधाण आले आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर सदावर्ते यांनी राज्य सरकार विरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली होती. आता ते सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता असून ते एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. त्यादृष्टीने ते तयारीला लागेल असल्याचे समजत आहे.

सध्या एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र आता सदावर्ते हेच या निवडणुकीत उडी घेणार असल्याने निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सदावर्ते राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला कसे आव्हान देतील हे पाहावे लागेल.

एसटी कामगारांच्या संपावेळी गुणारत्न सदावर्ते यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर निशाणा साधला होता. शरद पवारांमुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण होऊ शकलं नाही असा आरोप सातत्याने करत होते. आता तर या निवडणुकीमुळे गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा शरद पवारांवरच निशाणा साधण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदे यांनी एसटी बँकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे. हजारो सदस्यांना मतदान करता येणार नसल्याच्या कारणामुळे त्यांनी पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे

Leave a Comment