बाळासाहेब हिंदूंसाठी वाघासारखी डरकाळी फोडायचे आणि आता उद्धव ठाकरे मात्र …; साध्वी कांचन गिरींची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु असताना गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. यावेळी गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

साध्वी कांचन गिरी काल मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या दाखल होताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे. पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही यावेळी कांचन गिरी यांनी केली आहे.

Leave a Comment