नखे वाढवल्यामुळे मुख्याध्यापक ओरडले, त्यानंतर विद्यार्थिनीने केले असे काही ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुरुग्राम : वृत्तसंस्था – गुरुग्राममध्ये एका १५ वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लावल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. तसेच त्यांनी आपल्या तक्रारीत नखं वाढवल्याने, मोठे कानातले घातल्याने आणि मोबाईल सोबत बाळगल्याने मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीला ओरडले होते असा आरोप केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
९ एप्रिल रोजी मुलीच्या घरच्यांना तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या आधल्या दिवशी म्हणजेच ८ एप्रिलला मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांनी मुलगी शिस्त पाळत नाही, नखं वाढवते, मोठे कानातले घालते, मोबाईल सोबत ठेवते अशा तक्रारी केल्या. यानंतर मुख्याध्यापकांनी तुमच्या मुलीच्या अश्या वागण्याने मी तिला शाळेतून काढून टाकेन असे सांगितले होते. यानंतर मुलगी ८ एप्रिलला शाळेतून घरी आली. ती घरी कोणाशीच काही बोलली नाही तसेच जेवणसुद्धा केले नाही.

यानंतर ९ एप्रिलला विद्यार्थिनीचे पालक नववीत शिकत असलेल्या तिच्या भावाला घेऊन मुख्याध्यापकांना भेटायला गेले. तेव्हा त्यांनी मुलीला शाळेतून काढू नका, अशी विनंती केली. यानंतर मुख्याध्यापक अजून संतापले त्यांनी पालकांकडे दोन्ही मुलांच्या तक्रारी करत त्यांची नावे शाळेतून कमी करण्यास सांगितली. त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मुख्याध्यापकांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही. असे मुलीच्या काकांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

Leave a Comment