Gut Health | आतडे निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, बद्धकोष्ठताही होईल दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gut Health | आपले आरोग्य हीच आपली खूप मोठी दौलत असते. आपले जर शरीर निरोगी पाहिजे असेल तर त्यासोबत आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची खूप बारकाईने काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीरासाठी आपले आतड्याचे आरोग्य देखील निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. आपली पचनसंस्था मजबूत करण्यामध्ये आपले आतडे सगळ्यात मोठी भूमिका बजावतात. जर आपली पचन संस्थाच कमकुवत असेल तर आपल्या संपूर्ण शरीराचे नुकसान होते.

आजकालचे अनेक लोक आहेत ज्यांना पचनाशी (Gut Health) संबंधित अनेक तक्रारी आहेत. त्यांची पचनसंस्था त्यांना नीट साथ देत नाही त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आतड्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा लागेल. तसेच तेलकट पदार्थ आणि बेकरीयुक्त पदार्थ हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे तरच तुमच्या आतडे निरोगी राहणार आहेत. तर आज आपण अशा काही पदार्थांचा माहिती पाहणार आहोत. ज्याचे तुमच्या आहारात समावेश असल्याने तुमच्या आतडे अगदी निरोगी राहील.

दही आणि ताक उत्पादने

कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने समृद्ध असलेले दही आपल्या आतड्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. इतकंच नाही तर ते आतड्यांचे अस्तर सुधारते, त्यांची जळजळ कमी करते आणि संधिवात आणि दमा यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.

मनुका | Gut Health

हे गोड आणि आंबट ड्रायफ्रूट आहे. जे फायबरने समृद्ध आहे, जे आपल्या आतड्यांना डिटॉक्सिफाय करते आणि स्वच्छ करते आणि त्यांना आतून मजबूत करते.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि खनिज पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात, जे आपल्या आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

चिया सीड्स

हे फायबर आणि प्रोबायोटिक्सने भरलेले असतात, जे आपल्या आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

किवी | Gut Health

किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक तत्वे आपली पचनसंस्था मजबूत करून आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

कांदा

यामध्ये असलेले पोषक तत्व आतड्यातील बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. तसेच कांद्यामध्ये असलेले प्रोबायोटिक इन्सुलिन आपली प्रतिकारशक्ती वाढवते.

अंबाडी बिया

फायबर-समृद्ध फ्लेक्स बियाणे आतड्यांमधून विष काढून टाकतात आणि त्यांना नवीन जीवन देतात.

सफरचंद

पेक्टिन आणि फायबरने समृद्ध सफरचंद आतड्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे या सुपर फूड्सना तुमच्या आहार योजनेचा भाग बनवा.