Gut Health : आतड्यांचे आरोग्य जपतील ‘हे’ 5 पदार्थ; पचनसंस्थाही राहील मजबूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण काय खातो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे बिघडत्या जीवनशैलीचा प्रभाव तुमच्या खाण्यापिण्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. भूक मारणे, उपाशी राहणे, अवेळी खाणे, चुकीचे अन्न पदार्थ खाणे यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडत असते. खास करून आतड्यांच्या कार्यात अडथळा आल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

(Gut Health) आतड्यांचे आरोग्य सुव्यवस्थित असेल तर पोटाच्या समस्या होत नाहीत. पण जर आपण आपल्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर मात्र आतड्यांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे गंभीर आजारपण येऊ शकते. असे होऊ नये यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. हे पदार्थ कोणते? याविषयी जाणून घेऊया.

1. ताक

ताक हे पेय प्रोबायोटिक असल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन द्यावे लागते, हे काम ताकातील प्रोबायोटिक्स करतात. (Gut Health) तसेच आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे कार्य नीट चालते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.

2. तूप

तुपामध्ये ब्युटीरिक ॲसिड असते जे एक शॉर्ट- चेन फॅटी ॲसिड आहे. यामुळे आतड्याच्या आतील पेशींना पोषण मिळते आणि पचन क्रियेतील जळजळ कमी होते. परिणामी आतड्यांसंबंधीच्या समस्या दूर होतात आणि एकंदरीत पचनक्रिया सुधारते.

3. आलं (Gut Health)

आल्यामध्ये पचनक्रिया सुरळीत करतील असे काही घटक असतात. त्यामुळे आल्याचे ओल्या किंवा कोरड्या स्वरूपात सेवन करता येते. आल्यामुळे मळमळ वाटणे, स्नायू दुखणे, खोकला- सर्दी, अतिरिक्त चरबी, अपचन, जळजळ या समस्या दूर होतात. आळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आतड्यांतील जळजळ कमी करतात. यामुळे आतड्यांचे नुकसान टळते.

4. खडी साखर

खडी साखरेत रासायनिक पदार्थ नसतात. ज्यामुळे खाडी साखर शुद्ध मानली जाते. (Gut Health) खडी साखरेचे सेवन केल्यास लठ्ठपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती यासह आतड्यांच्या समस्या दूर होतात. परिणामी पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.

5. जिरे, धणे आणि बडीशेपचा चहा

जिरे, धणे आणि बडीशेप हे तिन्ही पदार्थ विविध औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. हे तिन्ही पदार्थ एकत्र वापरून बनवलेला गुणकारी चहा हा पोटाशी संबंधित समस्यांवर प्रभावी काम करतो. (Gut Health) गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा चहा मदत करतो.