Gut Health : आतड्यांमधील घाण काढून टाकतात ‘हे’ पदार्थ; पचनसंस्थाही करतात मजबूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gut Health) बऱ्याच लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या असतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस होणे आणि अजून बऱ्याच समस्या आपल्याला त्रास देतात. आतड्यांमध्ये जमलेली घाण यामागील मुख्य कारण असू शकते. कारण, लहान आतडे आणि मोठे आतडे हे आपल्या पचनसंस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांच्यात किंचितही बिघाड झाला तर साहजिक आहे त्यांच्या कार्यात अडथळा येणार. परिणामी, शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित न झाल्याने आतड्यांवर ताण येतो. मग अशावेळी आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय खावे? ज्यामुळे आतड्या निरोगी आणि पचनसंस्था मजबूत राहिल, याची माहिती आज आपण घेणार आहोत.

आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे? हे माहित असेल तर पोटाशी संबंधित समस्या कधीच होत नाहीत. शिवाय आपल्या काही सवयी देखील आतड्यांचे आरोग्य खराब करण्यास कारणीभूत असतात. (Gut Health) जसे की, यावेळी आणि चुकीचे अन्नपदार्थ खाणे, मद्यपान आणि धूम्रपान करणे. अशा सवयींमुळे आतड्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. असे होऊ नये म्हणून तुमच्या नियमित आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा.

कच्ची केळी (Gut Health)

कच्च्या केल्याचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत मिळते. कारण, कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्यदायी आंत मायक्रोबायोम वाढते. हे प्रतिरोधक स्टार्चने समृद्ध असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर संतुलित राहते. यासह इन्सुलिन संवेदनशीलतादेखील सुधारते.

दही

दही प्रो- बायोटिक आहार असल्यामुळे याचे नियमित सेवन करणे आपल्या आतड्यांसाठी फायदेशीर ठरते. दह्यातील अनुकूल जीवाणू हे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवतात. (Gut Health) परिणामी पचन सुधारते. इतकेच नव्हे तर, दह्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान करणारे जीवाणू शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठीही मदत करते.

अळशी

अळशीमध्ये असणारे फायबर हे विरघळणारे असते. तसेच यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड आपल्या आतड्यांमधील जळजळ कमी करण्यास सहाय्यक ठरते. त्यामुळे नियमित आपल्या आहारात १ ते २ चमचे अळशीचा समावेश करणे पचनसंस्थेला फायदेशीर ठरते.

ग्लुटेनमुक्त ओट्स

ग्लुटेनमुक्त ओट्सदेखील विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे. (Gut Health) त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी ग्लुटेनमुक्त ओट्सचे सेवन करणे अत्यंत चांगले मानले जाते.

अॅव्होकॅडो

अॅव्होकॅडो हे एक असे फळ आहे ज्यामध्ये विरघळणारे फायबर आणि निरोगी चरबीचा समावेश आहे. त्यामुळे अॅव्होकॅडो आरोग्यासाठी प्रचंड लाभदायक सिद्ध होते. अॅव्होकॅडोमधील पोषक घटक आतड्यांची शोषण क्षमता सुधारते आणि पचनक्रिया सुलभ करते. (Gut Health)