Sunday, May 28, 2023

जीम, सलून, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू; पण ‘हे’ नियम पाळावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून राज्य सरकारने काल राज्यात निर्बंध लादले होते. त्यानुसार जिम, आणि ब्युटी पार्लर वर पूर्णपणे बंदी होती. मात्र आज या निर्बंधात बदल करून 50 टक्के क्षमतेनुसार जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती पण जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. पण अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.

सौंदर्य सलूनसाठी 50% क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल . सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.

जीमसंदर्भातही असेच आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरण्याच्या अटीवरच 50% क्षमतेसह जिम उघडे ठेवण्याची परवानगी आहे . केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. जिमचे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील .