हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haiku Stairs Hawaii) जर कुणी तुम्हाला सांगितलं की जिवंतपणी तुम्ही स्वर्ग पाहू शकता. तर तुम्हाला विश्वास बसेल काय? अर्थात बसणार नाही. पण हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर असलेल्या हायकू स्टेअर्स अर्थात पायऱ्या थेट स्वर्गात घेऊन जातात म्हणे. होय. तुम्ही बरोबर वाचताय. थेट स्वर्गात जाण्याच्या पायऱ्या. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट कुणालाही अगदी सहज स्वर्गापर्यंत घेऊन जाऊ शकते. स्वर्गाच्या वाटेवर जावं असं कुणाला वाटत नाही? जर तुम्हालाही वाटतंय तर या आव्हानाला सामोरे जायला तयार व्हा. चला तर स्वर्गाच्या या पायऱ्यांविषयी अधिक माहिती घेऊया.
एकूण ३ हजार ९२२ पायऱ्या
हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर असलेल्या या पायऱ्यांची संख्या जवळपास ३ हजार ९२२ इतकी आहे. या पायऱ्या चढायचं म्हणजे एखाद मोठं आव्हान म्हटलं तर चुकीचं वाटायला नको. (Haiku Stairs Hawaii) मात्र या पायऱ्या चढताना दिसणारा आजुबाजूचा निसर्ग आणि येथील वातावरण मन प्रफुल्लित करून प्रेरणा जागृत करते. या उंच उंच डोंगराच्या पायथ्यापासून सुरु होणाऱ्या शिड्या दूरवर कुठेतरी धुक्यात हरवतात. अशावेळी प्रश्न पडतो की या पायऱ्या कधी आणि कुणी बांधल्या असतील? चला जाणून घेऊया.
या पायऱ्या कुणी आणि कधी बांधल्या? (Haiku Stairs Hawaii)
स्वर्गाकडे नेणाऱ्या या पायऱ्या धुक्यात हळूहळू दिसेनाशा होतात. अनेकदा एखादा ढग या पायऱ्यांवर विसावलेला दिसतो. या इतक्या उंच आणि अद्भुत स्वरूपात बांधलेल्या पायऱ्या कुणी आणि कशाला बांधल्या असतील असा प्रश्न जर मनात येत असेल तर त्यात काही चूक नाही. याविषयी सांगायचं तर, या पायऱ्या अमेरिकन नेव्हीने १९४० साली दुसऱ्या महाय़ुद्धाच्या काळात बांधल्या होत्या. त्याकाळी या डोंगरावर एक रेडिओ स्टेशन बांधण्यात आलं होत.
(Haiku Stairs Hawaii) ज्याद्वारे अमेरिकन नेव्हीकडून प्रशांत महासागरातील नौकासोबत संपर्क केला जायचा. काही काळाने हे रेडिओ स्टेशन बंद झाले. मात्र या रेडिओ स्टेशनपर्य़ंत जाणाऱ्या पायऱ्या तशाच राहिल्या आणि पुढे जाऊन या पायऱ्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाल्या.
स्वर्गाचं दार
मुळात स्वर्ग ही संकल्पना कायम माणसाला भुरळ पाडते. मेल्यावर स्वर्ग दिसतो असे म्हणतात. पण ज्याला जिवंतपणी स्वर्ग पाहायचा आहे त्याने किमान एकदा तरी चीनच्या या तियनमेन पर्वतरांगांमध्ये जावं. (Haiku Stairs Hawaii) चीनी भाषेमध्ये तियनमेन याचा अर्थ स्वर्गाचं दार असा होतो. चीनच्या हुनान प्रांतातील तियनमेन डोंगर रांगांमध्ये असलेलं हे स्वर्गाचं दार पाहण्यासाठी जगातील सर्वात लांब जवळपास साडेसात किलोमीटर केबलकारने जावे लागते. हा अनुभव अत्यंत वेगळा आणि अवर्णनीय असल्याचे अनेक लोक सांगतात.
डोळ्याचे पारणे फेडणारा परिसर
या ठिकाणी जायचे असेल तर घाट रस्त्याने जावे लागते. एकूण ११ किलोमीटरचा हा नागमोडी रस्ता आहे. मुख्य म्हणजे हा रस्त्या कापतेवेळी सावर दिसणाऱ्या स्वर्गाचं दार म्हणवल्या जाणाऱ्या गुहेजवळ ५ एकरवर एक मंदिर आहे. या मंदिराच्या पायऱ्या चढताना डोंगरमाथ्यावरील पारदर्शक सज्जे पाहून छान वाटते. (Haiku Stairs Hawaii) अनेकांनी या भागात श्रद्धेने झाडांना लाल कापड बांधले आहे. हा परिसर खरोखरच स्वर्गात असल्याची अनुभूती देण्याचे काम करतो.