सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटाचा पाऊस

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दुपारीपर्यंत तापलेले वातावरण अवघ्या काही काळातच ढगाळ वातावरण होऊन झालेल्या पावसाने सातारा जिल्हावासियांना चिंब केले. गारपीटांच्या वळीव पावसाने रस्त्यांवर होती-नव्हती तीही वाहतूक बंद झाली. या सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळी नऊपासून रकरकीत उन्हाने सातारा जिल्ह्यातील वातावरण तापलेले होते. रस्त्यांवरील वाहतूक ही कमी होत आली होती. दुपारी बारानंतर साडेतीनपर्यंत उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले. वारे जोराने वाहू लागले. शहरातील प्रमुख मार्गावरून चालू असणारी वाहतूकही बंद झाली. साडेचार-पाच दरम्यान पावसाचे टपोरे थेंब कोसळू लागले. पाहतापाहता गारांचाही वर्षाव सुरू झाला. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत पावसाने उन्हाच्या चटक्‍याचे परिवर्तन थंड हवेत गेले.

सातारा जिल्हावासियांना पावसाने चिंब केलेच, पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी भितीचेही वातावरण निर्माण झाले. काही परिसरात वीज खंडीत केली होती. तर काही ठिकाणी वाहनधारक पेट्रोल पंपासह मिळेल त्या आडोशाला उभे असल्याचे दिसून आले. साधारण साडेसहापर्यंत हा पाऊस पुन्हा शांत झाला. ऊन पावसाचा अनुभव काही ठिकाणी आला तर काही ठिकाणी जोरदार पावसाने गारवा जाणवला. साडेपाच नंतर मात्र पुन्हा पावसाचे वातावरण निवळले. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसाने काही ठिकाणी हानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सातारा शहरातील गुरूवार पेठेत नारळाच्या झाडावर वीज कोसळली.

You might also like