Hair Straightening Treatment | आज काल स्त्री आणि पुरुष सगळेच त्यांच्या केसांची खूप काळजी घेत असतात. आपले केस अत्यंत मऊसूद आणि चमकदार ठेवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. बाजारात केसांच्याबाबत अनेक प्रोडक्ट्स देखील आलेले आहेत . त्या केमिकल प्रॉडक्ट्स देखील ते केसांवर लावले जाते. आज काल केसांना स्ट्रेटनिंग (Hair Straightening Treatment) करणे एक खूप ट्रेंडमध्ये आलेले आहे. यामुळे आपले केस अत्यंत मऊ आणि सरळ होतात. परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. त्याचप्रमाणे केस सरळ करण्यासाठी कॅरोटीन ट्रीटमेंटचा देखील वापर केला जातो. यामध्ये अनेक केमिकल प्रॉडक्ट तुमच्या केसांवर लावून तुमचे केस सरळ केले जातात.
परंतु एका अभ्यासात असे समोर आलेली आहे की, असे उत्पादन तुमच्या केसांना लावल्यामुळे तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते. आणि याचे पुरावे देखील समोर आलेले आहे 2019 ते 2022 या दरम्यान 14 केंद्रांमधून जवळपास 26 प्रकरने किडनी खराब झाल्याची समोर आलेली आहेत. यांपैकी 20 वर्षाची एक मुलगी होती. तिला मूत्रपिंडाचा एवढा आजार गंभीर झाला की, तिला तीन वेळा डायलेसिसची आवश्यकता होती. केरोटिन ट्रीटमेंटमध्ये मूत्रपिंडात ऑक्सिलेट क्रिस्टलच्या निर्मितीमुळे दुखापत होण्याचा धोका वाढतो.
किडनीला कसा त्रास होतो ? | Hair Straightening Treatment
यामध्ये ग्लायऑक्सीलिक ऍसिड एपीडरमिस मधून जाते. आणि रक्तामध्ये सोसले जाते. तेथे वेगाने ग्लाय ऑक्सिलेट मध्ये रूपांतरित होते. जे किडनीसाठी विषारी असते. केस सरळ करण्यासाठी ऑक्सिडीक ऍसिड वापरल्याने कॅल्शियम ऑक्सिलेट किडनीच्या उतींमध्ये जमा होते. आणि आपली किडनी चांगल्या पद्धतीने काम करत नाही.bपरंतु ही स्थिती जेव्हा गंभीर होऊ लागते. तेव्हा आपल्याला डायलिसिसची देखील आवश्यकता लागते. अनेकवेळा यामुळे इतकी मोठी दुखावत होते की, आपली किडनीचे काम काम करत नाही. उपचारानंतर तुम्हाला सतत खाज सुटणे, चिडचिड होणे, व्रण उठणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही कॅरोटीन ट्रीटमेंट केली असेल आणि त्यानंतर तुम्हाला असे काही लक्षणे दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.