हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा महिलांना आणि मुलींना सांगितले जाते कीमासिक पाळीत केस धुवू नये. परंतु यामागचे खरे कारण हे अनेकांना माहितच नाही. आपल्या आजी आणि आईकडून ऐकले आहे की, मासिक पाळीत केस धुणे अशुभ आहे. मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी केस धुवावे. परंतु यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत तसेच ते कारण खर आहे की खोटे हे जाऊन घेऊया.
मासिक पाळीमध्ये जेव्हा आपण केस धुतो तेव्हा शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि शरीरातून मासिक पाळीचा स्त्राव होत नाही. त्याचप्रमाणे मासिक पाळी मध्ये केस धुतल्यावर पीसीओएस किंवा पीसीओडी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यांसारखे अनेक मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
स्त्री विषयक तज्ञांनी दिल्ली माहितीनुसार, मासिक पाळी केस धुणे हे अत्यंत सुरक्षित आहे. तुम्ही तर मासिक पाळी मध्ये केस धुतले, तर त्याचा तुमच्या मासिक पाळीवर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होत नाही. मासिक पाळी मध्ये केस धुवू नये ही एक समजूत आहे. केस धुतल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. अनेक लोक असे म्हणतात की, मासिक पाळी मध्ये केस धुतलेल्या जास्त त्रास होतो आणि केस खराब होतात. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. परंतु मासिक पाळीत केस धुणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मासिक पाळी आपण शरीराची जास्तीत जास्त स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही मासिक पाळीमध्ये केस धुवत असाल, तर कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. कारण वैज्ञानिकदृष्ट्या यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचत नाही.