हज यात्रेकरुंना फसवणारा 4 वर्षानंतर अटकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : एका ट्रॅव्हल्स चालकाने हज यात्रेकरूंना फसवून लाखो रुपयाचा गंडा घातला आहे. त्याचबरोबर स्वतः स्कॉटलंड, मलेशिया, आदी विदेशी फिरून आला आहे. हा भामटा चार वर्षांपासून गायब होता. नंतर हा भामटा शहरात आला आणि त्याने आझाद मैदानाजवळ एका जिममध्ये ट्रेनर म्हणून कामही केले. याबाबत तक्रारदारांना ही माहिती मिळताच त्यांनी भामट्याला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली. क्रांती चौक पोलीसांनी त्याला अटक केली असून न्यायलयाने 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अब्बास अली वाहिद अली हाश्मी (38, रा. नंदनवन कॉलनी) असे या आरोपीचे नाव आहे. सय्यद जमलोद्दीन गफ्फार (31) यांच्या आई -वडिलांना 2017 मध्ये हज यात्रेला जायचे होते. हज कमिटीद्वारे नंबर न लागल्याने त्यांनी खासगी एजंटद्वारे जाण्याचे ठरवले. त्याचा मित्र अब्दुल हाजी याने त्यांना पैठनगेट येथील अल – बशीर टूर्स या खासगी ट्रॅव्हल्सचा चालक अब्बास अली वाहिद अली हाश्मी याच्यासोबत त्याच्याच कार्यलयावर ओळख करून दिली. आवश्यक कागदपत्रे व दोन लाख 70 हजार रुपये देऊन त्यांचा व्यवहार ठरला. त्यानंतर जमालोद्दीन यांनी आई, वडील आणि भावाचे 5 लाख 10 हजार रुपये त्याला पाठवले. आणि 3 लाख रुपये रोख नेऊन दिले. तसेच, जमालोद्दीन परिचयाचे जफर कडू पठाण यांचे वडील कडू पठाण आणि आई यांनी देखील अब्बास अलीला 5 लाख 40 हजार रुपये दिले. सोबत रहेमान शेख यांचे नातेवाईक,मुजफ्फर मोहम्मद युसूफ मोहम्मद,शाकीर शेख नूर शेख यांनीही हज यात्रेला जाण्यासाठी विश्वास ठेवून पैसे दिले होते.

यानंतर अब्बास अली हा लाखो रुपये घेऊन पसार झाला. त्याने याच रकमेतून ऑनलाईन गुंतवणूक केली होती. त्यात त्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला तो मध्यप्रदेश उत्तर प्रदेशात राहिला. त्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल्स व्यवसाय सुरू केला. चार वर्षात अधून मधून तो शहरात येत होता त्याने तक्रारदारांना पैसे देतो अशी थाप मारली होती. तो औरंगाबाद येथे येऊन आझाद मैदानाजवळील एका जिम मध्ये ट्रेनर बनल्याची माहिती 13 जून रोजी तक्रारदारांना मिळाली असता त्यांनी लगेचच तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर गणपत दराडे यांच्या सूचनेवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि त्याला अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे करीत आहेत.

Leave a Comment