Monday, January 30, 2023

काय सांगता ! पोलीस स्टेशनमध्येच उरकला हळदीचा कार्यक्रम

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोनामुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाले आहेत. या कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या डुंगरपूर भागात घडली आहे. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम चक्क पोलीस स्टेशनमध्येच साजरा करण्यात आला.

या महिला कॉन्स्टेबलचे नाव आशा रोत आहे. तिचे ३० एप्रिल रोजी लग्न होणार आहे. पण राज्यात सध्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे तसेच ती पोलीस खात्यात असल्यामुळे तिला सुट्टी मिळाली नव्हती. आशाचा कार्यक्रम हा घरी करण्यात येणार होता पण तिला सुट्टी न मिळाल्याने पोलीस स्टेशनमधील महिला पोलिसांनी तिचा हळदीचा कार्यक्रम पोलीस स्टेशनमधेच केला. आशाचे गाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे आणि ३० एप्रिल रोजी तिचे लग्न आहे. राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यातच आशाची ड्युटीसुद्धा लागली होती अशी माहिती पोलीस स्टेशने इंचार्ज दिलीप दान यांनी दिली आहे.

- Advertisement -

आशाला दिले सरप्राइज
आम्हाला जेव्हा समजले कि आशाची हळद आहे आणि ती घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तिला सरप्राइज देत मुहूर्ताच्या हिशेबाने पोलीस स्टेशनमध्येच हळदीची तयारी केली. सर्व रितीरिवाज व्यवस्थितपणे पार पाडले अशी माहिती पोलीस स्टेशने इंचार्ज दिलीप दान यांनी दिली.

गेल्यावर्षी होणार होते लग्न
परंपरेनुसार नवऱ्या मुलीला खाटेवर बसवून वर फेकले जाते पण पोलीस स्टेशनमध्ये खाट नसल्याने तिला खुर्चीवर बसून वर फेकले. त्यानंतर संध्याकाळी आशाला सुट्टी मिळाली आणि तिच्या घरी गेली. तिचे लग्न गेल्यावर्षी मे महिन्यात होणार होते पण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. पण आता ३० एप्रिल रोजी तिचे लग्न आहे अशी माहिती आशाने दिली आहे.