संचारबंदीच्या विरोधात पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन, उद्या धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने येत्या 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशी व्यापारी महासंघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला.

मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात सतत लाॅकडॉऊन असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता शुक्रवार दि. 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी जाहीर केल्यामुळे व्यापारी वर्गामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचाच निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तीन दिवस आंदोलन पुकारले आहे. काल घंटानाद आंदोलनाने सुरुवात झाली. आज बुधवारी दि. 11 रोजी दुसऱ्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.

उद्या पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Comment