Thursday, February 2, 2023

दोन वर्ष कोव्हिड वार्डला ड्युटी करणार्‍या कामगारांच्या नोकरीवर गदा; कामावरुन काढून टाकताच कोरोना योद्धे आक्रमक

- Advertisement -

औरंगाबाद | घाटीतील कोरोना रुग्णालयातील (एसएसबी) एकही कथित कंत्राटी डॉक्टर, सिस्टर, तंत्रज्ञ, कामगार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नका, अन्यथा कोरोना संपला असे जाहीर करा, अशी मागणी अॅड. अभय टाकसाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एसएसबी कोविड रुग्णालयाने साथीच्या काळात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. मात्र, ‘गरज सरो वैद्य मरो’ याप्रमाणे प्रशासन रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहे. हे संतापजनक आहे. यातील एकही कामगार, कर्मचारी यांना कामावरून काढून टाकू नये, अन्यथा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अॅड. टाकसाळ यांनी दिला आहे.

- Advertisement -

या निवेदनावर विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, अभिजित बनसोडे, अजय सुरडकर, अमित भालेराव, आनंद सुरडकर, अतिश दांडगे, श्रीयोग वाघमारे, नंदा हिवराळे, नीता भालेराव आदींच्या सह्या आहेत.