खळबळजनक! पुण्यात शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

hand grenade found behind school
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट – पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड (hand grenade found behind school) आढळून आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे ग्रेनेड निकामी केला (hand grenade found behind school) आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तु आढळून (hand grenade found behind school) आली. या परिसरात राहणाऱ्या अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. यानंतर पोलीस पाटलांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द येथील पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनंतर त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि हे ग्रेनेड निकामी (hand grenade found behind school) केले. खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आलेला आहे. ७ ते ८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आता वर आला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा ग्रेनेड (hand grenade found behind school) या भरावामध्ये कुठून आणि कसा आला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर