हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली ; भाजपा नेत्याचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रवीश्चंद्रन अश्विनने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीतावस्थेकडे नेला. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाची जास्त संधी होती.पण भारतीय फलंदाज्यांच्या चिवट फलंदाजीने ऑस्ट्रेलिया च्या विजयाचा खास काढून घेतला.. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली आहे.

हनुमा विहारीच्या याच कुर्मगती फलंदाजीवर बाबुल सुप्रियो यांनी ताशेरे ओढले. फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे.हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. विजयाकडे पर्याय म्हणून न बघणे, मग तो कितीही दुरापास्त असू दे, असे करणे म्हणजे गुन्हा आहे, असे सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे. मात्र, आपल्याला क्रिकेटमधील काहीही कळत नाही, असी पुस्तीही खासदार महोदयांनी ट्विटमध्ये जोडली आहे.

हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासि विजयाची नोंद केली असती” असे बाबुल सुप्रियो म्हणाले. “कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार मारायला पाहिजे होते” असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment