हनुमान जयंती निमित्त भद्रा मारुती मंदिर राहणार बंद.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : देशभरात प्रसिद्ध असलेला खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले आहे. यावर्षी हनुमान जयंतीनिमित्त मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. त्याबरोबरच यावर्षीचा हनुमान जयंती यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली आहे.

दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारोती मंदिरात यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते.भाविकही लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली आहेत. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणांवरती बंदी घालण्यात येत आहे. म्हणून यंदाचा यात्राउत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही जयंतीच्या दिवशी दर्शनाला येऊ नये आणि गर्दी करू नये असे आवाहन भद्रा मारुती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार महापूजा :
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून फक्त दोन मुख्य पूजारी आणि तीन ट्रस्टी यांच्यासह महापूजा केली जाणार आहे. तसेच सर्व भाविकांना मंदिरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment