Monday, January 30, 2023

सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणे पडले महागात,वरिष्ठ डॉक्टरला नातेवाईकांकडून बेदम मारहाण

- Advertisement -

हातकणंगले : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या महामारीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. तसेच या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उद्भवत आहे. या रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीडमधील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या खोलीत घुसून सहकारी कर्मचाऱ्याने तिचा विनयभंग केला होता. हि घटना ताजी असताना अशीच एक घटना कोल्हापूरातील एका शासकीय कोविड सेंटरमध्ये घडली आहे.

या घटनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका शासकीय कोविड सेंटरच्या प्रमुख डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरचा छळ केला आहे. हा डॉक्टर मागच्या बऱ्याच दिवसांपासून पीडित महिला डॉक्टरचा छळ करत होता. तसेच तिला मानसिक त्रास होईल, असं वर्तनदेखील करत होता. वरिष्ठ डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती पीडित महिलेने आपल्या घरी आणि नातेवाईकांना दिली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख प्रथमश्रेणी डॉक्टरला रामलिंग फाट्यावरील एका हॉटेलमध्ये चांगलाचं चोप दिला.

- Advertisement -

यावेळी आसपासच्या नागरिकांनी आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी बरीच गर्दी केली होती. यानंतर तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले. यामुळे या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली नाही. आरोपी डॉक्टर हा मार्च पासून शासकीय कोविड सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. हा डॉक्टर मागच्या दीड वर्षांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. तर या प्रकरणातील पीडित महिला डॉक्टर इचलकरंजी येथील रहिवासी असून या कोविड सेंटरमध्ये सहाय्यक महिला डॉक्टर म्हणून काम करते. हा डॉक्टर मागच्या बऱ्याच दिवसांपासून पीडित महिला डॉक्टरचा छळ करत होता. त्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे.