हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी
बेकॉन हेल्थकेअरची सामाजिक बांधिलकी या उपक्रमासाठी बेकॉन हेल्थकेअरच्या लियाकुद्दीन , राजेश पाटील व महादेव यांनी जवळपास 12 हजार किंमतीची मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधी परभणीतील एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी रोजी 72 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यात आली.
एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजारग्रस्त बालकांना संधी साधू आजारापासून बचावासाठी पोषक आहार सोबत, हिमोग्लोबिन वाढी सोबत कॅल्शियम, आयर्न, मिनरल आदी घटकांची योग्य मात्र आवश्यक असते ते नसेल तर ऍनिमिया अर्थात पंडुरोग सारख्या आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी एचएआरसी संस्था पोषक आहार व वापरविषयी जनजागृती सोबत हिमोग्लोबिन वाढी साठी मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधीचे वाटप करत असते.
12 फेब्रुवारी रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे 72 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यासाठी एचआयव्ही ग्रस्त बालके व माता यांचे नेटवर्क चालविणाऱ्या ‘विहान’ या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. ही औषधी पुढे विहान या संस्थे मार्फत हिमोग्लोबिन कमी असलेल्या व पोषण ची आवश्यकता असलेल्या एचआयव्ही ग्रस्त बालके व मातांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, रितेश कालानी, गोपाळ मुरक्या, संदीप भंडे, लियाकुद्दीन , राजेश पाटील व महादेव, विहान संस्थेच्या बबिता चरण यांनी परिश्रम घेतले.