Hardik Pandya And Jasmin Walia : हार्दिकला मिळालं नवं प्रेम? मुंबईच्या बस मध्ये चढली ‘ती’ मिस्ट्री गर्ल

Hardik Pandya And Jasmin Walia (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hardik Pandya And Jasmin Walia । मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा पत्नी नताशाच्या घटस्फोटानंतर ब्रिटिश सिंगर आणि टीवी पर्सनालिटी जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र या चर्चाना खरं बळ मिळालं ते कालच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचाय सामन्यानंतर… जास्मिन वालिया हि हार्दिक पांड्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हजर तर होतीच, परंतु याशिवाय मुंबई इंडियन्सच्या बस मधेही ती चढली. त्यामुळे हार्दिक पांड्याला नवं प्रेम मिळालं का? या चर्चाना पुन्हा एकदा जोर आला.

नेमकं काय घडलं? Hardik Pandya And Jasmin Walia

आयपीएल सामन्यांदरम्यान, अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये येत असतात. खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असते. आयपीएल फ्रँचायझी हॉटेल ते स्टेडियम किंवा विमानतळापर्यंत प्रवास करण्यासाठी खेळाडूंच्या बससह फॅमिली बसची व्यवस्था सुद्धा करते. मुंबई इंडियन्सच्या कालच्या सामन्यानंतर जास्मिन वालिया त्या बस मध्ये चढली ज्यामध्ये खेळाडूंचे कोचिंग स्टाफ किंवा कुटुंबातील सदस्य प्रवास करत असतात. याबाबतचा एक विडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य ज्या बसमध्ये चढत आहेत त्या बसमध्ये चढताना दिसत आहे. जास्मिनच्या आधी, दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज बसमध्ये चढताना दिसते.

यावेळी जास्मिन ने एक लांब काळा ड्रेस घातला होता. जास्मिन बसमध्ये चढते आणि मागच्या सीटवर बसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवरील कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिले की, ‘जर ती टीम आणि फॅमिली बसमध्ये असेल तर ही अफवा नाही तर कन्फर्म गर्लफ्रेंड आहे’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हार्दिकला प्रेम मिळायला हवे, तो त्यास पात्र आहे’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ही एकत्रता आयुष्यभरासाठी नाही’.

यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान, जस्मिन स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya And Jasmin Walia ) पाठिंबा देताना दिसली. गेल्या वर्षी एका रेडिट वापरकर्त्याने हार्दिक आणि जास्मिनच्या ग्रीस सुट्टीच्या छायाचित्रांचा कोलाज शेअर केला तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी सर्वात आधी समोर आली होती. मात्र हार्दिक आणि जस्मिन या दोघांनीही अजूनपर्यंत त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.