फडणवीसांच्या टीकेवर हरी नरकेंनी दिले ओपन चॅलेंज… म्हणाले हिम्मत असेल तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे महापालिका सभागृह नेते हेमंत रासने यांच्या पुढाकाराने पुण्यात १० रुपयात ए सी बसचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “विचारवंत हरी नरके यांच्यावरही टीकाही केली. त्यांच्या टीकेला जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी उत्तर दिल आहे. “फडणवीस प्रश्नांपासून पळ काढू नका. आरक्षण मुक्त आशा भारताचे तुम्ही पाईक आहात. असे असताना मग तुम्ही बुद्धिभेद आणि शब्दछल का करता? असे करण्याचा तुम्ही पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो,आहे हिम्मत?, असे चॅलेंज नरके यांनी फडणवीसांना केले आहे.

पुणे याठिकाणी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जेष्ठ विचारवंत आणि ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी म्हंटल होत कि, जेष्ठ विचारवंत आणि ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके हे सध्या विचारवंत कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेचं जास्त वाटतं आहेत. फडणवीसांच्या टीकेला नरकेंनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. त्यांनी फडणवीसांनी थेट नऊ प्रश्न विचारले आहेत. तसेच ओपन चॅलेंजही केले आहे.

https://www.facebook.com/100001881615760/posts/5813126245426705/

हरी नरकेंनी फडणवीसांना आपल्या फेसबुक अकाऊंटवरून उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी काही महत्वाचे प्रश्नही फडणवीसांना विचारले आहेत. त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारचा देता मागू नका म्हणता तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता? (२) तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय,तरी त्वरा करा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना का लिहिले होते?तुम्ही आठ आठवड्यात ही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचे. (३) जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता? केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या?असे महत्वाचे काही प्रश्नही यावेळी नरक यांनी फडणवीसांना विचारले आहेत.

Leave a Comment