मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युवा वेटलिफ्टिर हर्षदा गरुडने (harshada garud) ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकत तिने हि कामगिरी केली आहे. हि कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. 45 किलो कॅटेगरीत तिने 153 किलो वजन उचलून तिने हि कामगिरी केली आहे. तिने स्न्न्याच मध्ये 70 किलो आणि क्लीन जर्कमध्ये 83 किलो वजन उचलून हि कामगिरी केली आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण पदक जिंकून हि कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत 8 जणांना मागे टाकून हि कामगिरी पार पाडली. या स्पर्धेत टर्कीच्या बेकतास कॅनस्नूने रौप्यपदक तर मोलडोव्हच्या टिओडोराने कांस्य पदक मिळवले आहे. याच कॅटेगरीमध्ये दुसरी भारतीय अंजली पटेलने पाचवा क्रमांक मिळवला आहे. तिने एकूण 148 किलो वजन उचलले आहे.
हर्षदाच्या आधी फक्त दोन भारतीयांनी जिंकले मेडल
हर्षदाच्या (harshada garud) आधी ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत दोन महिलांना पदक जिंकण्यात यश आले आहे. या स्पर्धेत 2013 मध्ये मीराबाई चानूने कांस्यपदक तर मागच्या वर्षी चिंता शेउलीने या स्पर्धेत रौप्य पदकाची कामगिरी केली होती. हर्षदाचे (harshada garud) वेटलिफ्टर होते. देशासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न होते, पण त्याच्या मुलीने आता ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
हे पण वाचा :
असदुद्दीन ओवेसींनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि…
राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ?? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच
Bank Of India च्या ग्राहकांना झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात
सासऱ्याकडे केलेली मागणी ‘ती’ पूर्ण न झाल्याने नवविवाहितेची आत्महत्या