औरंगाबाद – हर्सूल येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यानंतर याठिकाणी सिविल वरचे काम सुरू होईल. डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मनपाकडून तयारी सुरू असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्प कधी सुरू होईल हे पहाणे महत्त्वाचे ठरेल.
शहरात फेब्रुवारी 2018 मध्ये कचरा कोंडी निर्माण झाली. यानंतर कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा, कांचनवाडी, पडेगाव आणि हरसुल या चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने देखील 147 कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केलेला आहे. सर्वप्रथम चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला. कांचनवाडी येथे गॅस निर्मिती प्रकल्प आणि पडेगाव घनकचरा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. परंतु, हर्सूलच्या प्रकल्पाला सुरुवातीपासून गावकऱ्यांनी विरोध दर्शवला, त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान, आता गावकऱ्यांचा विरोध मावळला आहे. प्रकल्पाच्या बाजूला खासगी जमिनी आहेत मनपाला 1.31 हेक्टर अतिरिक्त जमीन लागणार आहे. भूसंपादनाला द्वारे ही जमीन घेण्यात येईल. भूसंपादन आनंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागेल. आधी सिविल वर्क चे काम पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी मनपाकडून सुरू आहे.