दहशदवाद्यांचा कट उधळला!! 4 संशयित अतिरेकी पोलिसांच्या ताब्यात; नांदेड कनेक्शन ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरयाणातील करनाल पोलिसांनी 4 संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेत मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल 31 जिवंत काडतुसे आणि 130000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे चौघे महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत, संदीप, परमिंदर आणि भूपेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील तीन फिरोजपूरचे रहिवासी आहेत तर एक लुधियानाचा आहे. हे चारही आरोपी दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते. त्यापूर्वीच पोलिसांनी बस्तारा टोलजवळ इनोव्हा गाडीत बसलेल्या या संशयित दहशदवाद्यांना ताब्यात घेतले.

हे चारही आरोपी पाकिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याच्या इशाऱ्यावर काम करत होते. रिंदा यांनीच त्यांना शस्त्रे पुरवली आणि त्यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथे नेण्याचे काम सोपवले. त्याबदल्यात चौघांनाही मोठी रक्कम मिळायची. रिंडा या अतिरेक्यांना ड्रोन पुरवायचा आणि मोबाईल अॅपवरून लोकेशन पाठवाय. त्यानंतर ते स्फोटके ठराविक ठिकाणी पोहोचवत असत.

दहशतवादी रिंडा याने अटक केलेल्या तरुणांना मोबाईल अॅपद्वारे लोकेशन दिले होते. त्यानुसार त्याला फिरोजपूर येथे बोलवलं होते. फिरोजपूर येथील भारत-पाक सीमेजवळ अटक करण्यात आलेला आरोपी गुरप्रीतचा मित्र आकाशदीपच्या मामाचे शेत आहे. याच शेतात ड्रोनमधून स्फोटकांचा पुरवठा करण्यात आला. तिथून स्फोटके उचलून चौघांना तेलंगणा गाठायचे होते. त्याआधी आयबीच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला कर्नालमध्ये पकडले.

Leave a Comment